Jump to content

User:ShriJitendraNathMaharaj

From Wikipedia, the free encyclopedia
                                  'परमपूज्य  सद्गुरू  जितेंद्रनाथ महाराज' 

(जन्म तिथी:- विजयादशमी (दसरा), वार-शनिवार, दि. २९/०९/१९९० रोजी) श्री. भाऊमहाराज नाथजी व श्री. हटेंद्रनाथजी यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथ यांच्या संकल्पनेतून हिवरे तर्फे नारायणगाव शिवहरीनगर या ठिकाणी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांचे” भव्य मंदिर असून, या ठिकाणाहून नाथ संप्रदायाच्या कार्याचा प्रचार प्रसाराचे व दुःखी लोकांचे दुःख दूर करण्याचे कार्य गुरुवर्य जितेंद्रनाथ यांनी हाती घेतले आहे. पण सर्वप्रथम या कार्याची सुरुवात त्यांच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून सुरू झाली, या कार्यामागे त्यांच्या आई - सौ. संगीता चंद्रकांत कुंभार (आऊसाहेब)आणि वडील - श्री.चंद्रकांत कुंभार(बाबा)यांचे मोलाचे योगदान आहे.

लहानपणापासूनच आई-वडील व त्यांचे कुटुंब अध्यात्मिक सेवेत असल्या कारणाने घरामध्ये आदिनाथ महादेवांची, दत्तप्रभूंची व नवनाथांची सेवा घरात होत असत, आई-वडिलांच्या या अध्यात्मिक संस्कारामुळे गुरुवर्य श्री.जितेंद्रनाथजी यांच्यावर नवनाथांच्या सेवेचा व कार्याचा प्रभाव पडणे साहजिकच होते. यातुनच त्यांनी श्री. मच्छिंद्रनाथांचे पुत्र मीननाथ यांची आठ वर्ष रोजची तीन तास ध्यान साधना करत असत. या साधनेतून श्री. मीननाथांचा साक्षात्कार झाला व त्यांच्या आदेशानुसार श्री. जितेंद्रनाथजी यांनी आदिनाथ महादेवांची कठोर साधना सुरू केली, या साधनेतून महादेवांचा कृपाआशीर्वाद नाथकार्यासाठी मिळाला. महादेवांनी नवनाथांमधील सर्वात प्रथम असणारे नाथजी म्हणजेच “बडेबाबा मच्छिंद्रनाथ” यांची साधना करावयास सांगितले, या साधनेतून “बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी” प्रसन्न होऊन त्यांना नाथ संप्रदायाचा प्रचार- प्रसार व दुःखी लोकांचे दुःख दूर करण्याचे आदेश दिले.

गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथांना गुरु नसल्याकारणाने “बडेबाबा मच्छिंद्रनाथांनी” सर्वप्रथम गुरुवर्य जितेंद्र नाथांना देहरूपी गुरु करावयास सांगितले, कारण की गुरुशिवाय ज्ञान नाही. परंतु नाथ संप्रदायाचे कार्य करत असताना गुरु नसल्याकारणाने काही अडथळे निर्माण होत असत, पण “बडेबाबा मच्छिंद्रनाथांच्या” आदेशानुसार प्रथमता श्री. भाऊ महाराज नाथजी व त्यांच्या कृपाआशीर्वादाने श्री. हटेन्द्रनाथजी यांची गुरुकृपा प्राप्त करून घेतली. व खऱ्या अर्थाने नाथ संप्रदायाच्या कार्यासाठी श्री.जितेंद्रनाथजी यांना एक नवसंजीवनीच मिळाली. म्हणूनच म्हटले आहे की, मिल जायेंगी तुम्हे तुम्हारी मंजीले | वो हवा के रुख भी बदल जायेंगे |अगर नाथजीने सर पे हाथ रखा | तो राह मे बुझे हुए चिराग भी जल उठेंगे | वरील पंक्तीनुसार श्री. जितेंद्रनाथांना नाथ कार्यामध्ये एक आगळे-वेगळे चैतन्य निर्माण झाले. संपूर्ण महाराष्ट्रभर, देशभर श्री. जितेंद्रनाथाजी यांचा शिष्य परिवार वाढत असून ज्याप्रमाणे उगवत्या सूर्य नारायणाच्या किरणांचा प्रकाश सर्वदूर पसरतो आहे. त्याचप्रमाणे श्री. जितेंद्रनाथजी यांच्या नाथ कार्याचा प्रचार- प्रसाराचा प्रकाश सर्वदूर पसरत आहे.

सर्वप्रथम गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथांनी त्यांच्या राहत्या ठिकाणी वाकडगांव, ता. मुळशी, जि.पुणे येथे “बडेबाबा मच्छिंद्रनाथ शक्तिपीठ” या शक्तीपिठाची स्थापना त्यांचे गुरुवर्य श्री. हटेंद्रनाथजी यांच्या कृपाशीर्वादाने केली. व या शक्तिपीठावर गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथांनी महिन्यातील प्रत्येक गुरुवारी म्हणजेच चार दिवसाची जीव ब्रह्म सेवा चालू केली. ही सेवा सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांची” आरती होईपर्यंत म्हणजेच संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत चालते. नाथ संप्रदायाचा तरुण पिढीचा वाढता कल पाहता व प्रसार पाहता गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथांनी हिवरे तर्फे नारायणगाव शिवहरीनगर या ठिकाणी “बडेबाबा मच्छिंद्रनाथांचे” भव्य दिव्य मंदिराची स्थापना करून भक्तांसाठी आश्रमाची निर्मिती केली व सर्व भाविकांना अन्नदानाची सोय केली. गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथांनी नाथ संप्रदायाच्या सेवेसाठी एवढ्यावरच न थांबता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे कायमस्वरूपाची (परमनंट) नोकरीचा राजीनामा दिला. आपल्या संपूर्ण परिवरचा एकधाही मागचा-पुढचा विचार न करता, नवनाथांच्या सेवेसाठी व नाथकार्यासाठी एवढा मोठा त्याग आशा महान नाथयोग्याने केला. अशा महान नाथयोग्याला कोटी कोटी प्रणाम.

गुरुवर्य श्री. जितेंद्रनाथजी नाथसेवेचे कार्य करत असताना तरुण पिढीला ते कळकळीने सांगतात की : १) मांसाहार न करणे, २) मदिरापान न करणे व कोणत्याही प्रकारचे व्यसन न करणे. ३) परस्त्री मातेसमान मानने. ४) धन योग्य मार्गातूनच कमावणे. ५) सत्य मार्गाचा अवलंब करणे.

वरील पाचही तत्वांचे काटेकोर पणे आचरण करून प्रत्येक साधकाला नवनाथांचा कृपाआशीर्वाद प्राप्त करता येतो.

अलख निरंजन आदेश आदेश आदेश . . .