Jump to content

User:Rekha phad

From Wikipedia, the free encyclopedia

मी सौ. रेखा दत्तात्रय फड जिल्हा बीड - मराठवाडा

मी गेली 13 वर्षं झाली राजकारणात सक्रिय आहे. सुरवात माझी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) मधून झाली पण पहिल्यापासून मला समाजसेवा करण्याची आवड होती... त्याला राजकारणाची झालर मिळाली, आज माझे आणी देशाचे नेते, खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब नेहमी सांगतात की 80% समाजकारण आणी 20% राजकारण करा, अगदी त्याच प्रमाणे या दोन्हींची याची सांगड घालत अगदी त्या दिवसांपासून कामाला सुरुवात केली... त्यावेळी मी मनसेची बीड जिल्हा अध्यक्ष म्हणून काम पाहत होते.

प्रथम काम करत असतांना त्रास झाला पण, नंतर जसजशी मी स्वतःला समाजकार्यात वाहून घेतलं, तेंव्हा मात्र ती सवय झाली. अस काम करत असतांना मी प्रथम प्राधान्य महिलांच्या अडचणी सोडवण्यावर माझा फोकस दिला. महिलांवर होणारे अत्याचाराला वाचा फोडणे शेतकऱ्यांच्या समस्याच निरसन करणे, रोजंदारीवर काम करणारे कामगार त्यांच्या अडचणी सोडवणे, विधवा महिलांना शासनाकडून संजयगांधी निराधार योजनेतून पगार सुरु करून देणे.


वयस्कर म्हणजे वय वर्षं 65 अशा आई-वडिलांना मुलं सांभाळत नाहीत त्या जोडप्यांना शासनमान्य श्रावणबाळ योजनेतून दर महिन्याला जगण्याचं साधन म्हणून मानधन सुरु करून दिले. एकल, घटस्फोटित अशा कित्येक महिलांना सुद्धा शासनाच्या योजनेचा दरमहा आर्थिक लाभ मिळवून दिला. हुंडाबळी गेलेल्या कित्येक लेकींना न्याय मिळवून दिला...

आशावर्कर - अंगणवाडी सेविका यांच मानधन वाढावे त्यांच्या इतर मागण्या मान्य व्हाव्यात म्हणून त्यांना सोबत घेवून आंदोलन करून त्यांचा हक्क त्यांना मिळवून देण्यात थोडा का होईना खारीचा वाटा उचलला... त्यांना न्याय मिळवून दिला.

माझ हे काम पाहून मनसेचे अध्यक्ष सन्मानीय राजसाहेब ठाकरे यांनी माझ्यावर संपूर्ण मराठवाडा अध्यक्ष ही जवाबदारी सोपवली. ती जवाबदारी सुद्धा मी तितक्याच प्रामाणिकपणे पार पाडली. त्यावेळी आमच्या बीड जिल्ह्यातून 'स्त्री' लिंग गर्भ चाचणी म्हणजे स्त्रीभ्रूण हत्या भयंकर होत होत्या... त्यासाठी मी माझ्या काही सहकारी सोबत घेवून रस्त्यावर उतरले. जिथे हे डॉक्टर्स चोरून कुकर्म करत होते, ते हॉस्पिटल फोडले त्यातील एक उदाहरण परळी येथील डॉ. सुदाम मुंडे यांच हॉस्पिटल फोडून त्यांना पोलिसांच्या ताब्यात देवून त्यांच्यावर #PCNDT ऍक्ट नुसार "एफआयआर" दर्ज केला.. मुंडे पती-पत्नी यांना सजा लागली आजही ते सजा भोगत आहेत. स्त्रीभ्रूण हत्या थांबवण्यासाठी कितीतरी हॉस्पिटल फोडले, पण कायदा हातात घेतल्यामूळे माझ्यावरही अनेक गुन्हे दाखल झाले...

माझे काम सुरुचं होते पण 2017 ला माझ जिल्ह्यातील, मराठवाड्यातील काम पाहून माझे मोठे बंधू ना.धनंजयजी मुंडे साहेब हे विरोधी पक्ष नेते होते. त्यावेळी त्यांनी मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याची ऑफर दिली... आणी ती मला नाकारता आली नाही. 11 जानेवारी 2017 ला मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात धनुभाऊच्या मार्गदर्शनाखाली प्रवेश केला. आणी बीड जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसची जिल्हा अध्यक्ष झाले.

इथून माझ्या दुसऱ्या आणी नवीन पर्वाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात #महायुतीचं सरकार होत. आम्ही विरोधी बाकावर होतो. मग काय... युतीत रोज धुसफूस सुरु होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे प्रमाण विदर्भ आणी मराठवाड्यात जास्त होत, त्यात बीड जिल्ह्यात तर रोज एक शेतकरी आत्महत्या ठरलेली होती. इंधनाचे दर गगनाला भिडले होते. तूर डाळ 100 च्या पूढे गेली होती. गॅसचे भयंकर दर वाढून 1000 रु. गॅस सिलेंडर झाले होते. या सगळ्यामूळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली होती. त्यांच रोजच जगणं मुश्किल झालं होत. त्यात मोदी सरकारने नोटबंदी करून अजून आगीत तेल ओतलं... आणी इथेच सर्वसामान्यांच पूरतं कंबरड मोडल... या सर्वं समस्या सोडवण्यासाठी त्या एक वर्षांत माझ्या महिला सहकारी सोबत घेवून रस्त्यावर उतरून विविध, अनोख्या पद्धतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करून सरकारच लक्ष वेधलं...

अशी अनेक म्हणजे जवळजवळ 100 च्या वर राष्ट्रवादी महिला काँग्रेच्या वतिने माझ्या नेतृत्वाखाली आंदोलन करून नुसता बीड जिल्हाच नाही तर अख्खा महाराष्ट्र दणाणून टाकला... या आंदोलनाची दखल तत्कालीन सरकारला घ्यावी लागली.


यामध्ये माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले. यात मी दोन वेळा जेलमध्ये सुद्धा जावून आले. एका वेळी माझ्या सहकारी महिलांन सोबत चार दिवस जेलमध्ये होते. तर दुसऱ्यावेळी मी एकटीने 27 दिवस जेलमध्ये काढले... आजही कोर्टकचेऱ्या चालू आहेत.. आता सध्या माझ्यावर औरंगाबाद जिल्हा व परभणी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी 'पक्ष निरीक्षक' म्हणून जवाबदारी आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेली ही जवाबदारी सुद्धा मी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा, त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे..

पण मी या घेतलेल्या मेहनतीच, संघर्षाच फळ मिळालं... विधानसभा निवडणूक 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आमचं #महाविकास_आघाडीच_सरकार आल.. आता आम्ही महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वपूर्ण घटक म्हणून सत्तेत आहोत.. काम छान चालू आहेत. आमच सरकार अतिशय महत्वपूर्ण, आणी जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे. राज्यातील हे सरकार शेतकरी, कष्टकरी, कामगार आणी गोरगरीब जनतेचं सरकार आहे.. याचा मला सार्थ अभिमान आहे...!!! धन्यवाद! 🙏