Jump to content

User:Rayatecha Vaali

From Wikipedia, the free encyclopedia

‘रयतेचा वाली’ हे जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेले डिजिटल शैक्षणिक दैनिक आहे. यामधील कोणताही मजकूर संबंधितांनी आम्हाला दिल्यानुसार प्रसिद्ध केला जातो. त्यामुळे त्यातून व्यक्त होणारे विचार व अन्य बाबींशी आम्ही जबाबदार असूच असे नाही. आपला नम्र, श्री.शाहू संभाजी भारती (९९७५७३८३२१) https://rayatechavaali.blogspot.com/

धन्यवाद महाराष्ट्र ! आदरणीय डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या वृत्तपत्रावर प्रेम करणारे लाखो वाचक बंधु-भगिनी आणि माझे विद्यार्थी बाळगोपाळ, या दैनिकाला रोज फॉरवर्ड करणारे नेटकरी, याला प्रसिद्ध करण्यायोग्य मजकूर पुरविणारे शेकडो तालुका - जिल्हा प्रतिनिधी, प्रसिद्ध व नवागत साहित्यिक मंडळी, कवि, कवयित्रि, चित्रकार आणि वेळोवेळी मदत तसेच मार्गदर्शन करणारे सर्व यांना माझा सप्रेम नमस्कार ! आपल्या सर्वांच्या मदतीने आज दैनिक रयतेचा वाली चा ५०० वा अंक प्रसिद्ध होत असल्याबद्दल सर्वांना आभाळभरून शुभेच्छा ! ‘महापुरे झाडे जाती, तिथे लव्हाळे राहती’ या संत वचनानुसार कोणत्याही क्षेत्रात काळानुसार जे चालतात म्हणजे बदल स्वीकारतात, तेच टिकतात. जाहिरातीच्या जमान्यात आपले कार्य आपण स्वत: जोपर्यंत सादर करणार नाही; तोपर्यंत आपली दखल कुणीही घेणार नाही. ही बाब हेरून आपल्या शिक्षण क्षेत्रातील आदर्शांना प्रमाण मानत त्यांचे कार्य इतरांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास घेऊन आपण गतवर्षी दैनिक रयतेचा वाली हे डिजिटल व्यासपीठ निर्माण केले. आता याची पाळेमुळे खोलवर रुजलेली पाहून आंतरिक समाधान वाटत आहे. अगदी चांदयापासून बांदयापर्यंतचे प्रतिनिधी अतिशय तळमळीने हा वसा चालवत आहेत. ही बाब आशादायक आहे... रयतेचा वाली मधून प्रसिद्ध होणार्याव बातम्या पाहून अनेक शिक्षकांच्या, विद्यार्थ्यांच्या चेहर्यारवर समाधान दिसते. त्या समाधानातच संपूर्ण रयतेचा वाली परिवाराचे समाधान सामावलेले आहे. म्हणून तर कुणाकडूनही नव्या पैशाची अपेक्षा न करता प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी ते अगदी सुशिक्षित बेरोजगार किंवा महाविद्यालयीन विद्यार्थी असोत; स्वत: होऊन ‘रयतेचा वाली’ चे प्रतिनिधीत्व मागत आहेत. आणि आपणही त्यांना ते देत आहोत. ‘ज्यांची कुणीही दखल घेत नाहीत; त्यांची दखल रयतेचा वाली घेतो.’ हा विश्वास समाजात पसरत चालला आहे. म्हणून सामाजिक आशयाच्या अनेक बातम्याही आपल्याला प्रसिद्ध कराव्या लागत आहेत. राजकीय आणि जातीय वा नकारात्मकता पसरवणार्याय बातम्यांना आपण कधीही प्रसिद्ध करीत नाहीत आणि भविष्यातही करणार नाहीत.

समस्तांचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या कृपाशीर्वादाने ‘दैनिक रयतेचा वाली’ नामक ‘डिजिटल ज्ञानरथ’ आपल्या सर्वांसमक्ष चालू आहे. यातील मी एक सारथी आहे. आणि इथे अनेक रथी-महारथी आपापले योगदान मोठ्या निष्ठेने देत आहेत. याचेच फलित म्हणून – कल्पनातीत वाटणारे कार्य महाराष्ट्रात घडत आहे. आज दैनिक रयतेचा वाली परिवार दैनिकासोबतच पाक्षिक आणि मासिक ही तेवढ्याच जोमाने चालवत आहे. या महंमंगल कार्यात योगदान देत असलेल्या प्रत्येकासमोर मी नतमस्तक आहे. हा चालू केलेला ज्ञानयज्ञ असाच चालू राहावा यासाठी आपण सर्वांनी शक्य तेवढे सहकार्य करावे, ही नम्र विनंती करतो आणि त्या विधात्याकडे मागणे मागतो, की त्या प्रत्येकाचे हात येवढे मजबूत कर, की ते हात विधायक कामासाठी कधीही तत्पर असतील ! आपले सर्वांचे पुनश्च धन्यवाद !


आपला नम्र-विश्वासू, श्री. शाहू संभाजी भारती ( ९९७५७३८३२१ ) संपादक, दैनिक-पाक्षिक-मासिक रयतेचा वाली


  • ५०० वा अंक मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा

मराठी भाषेतील एकमेव जाहिरातमुक्त आणि निशुल्क असलेल्या डिजिटल शैक्षणिक *दैनिक रयतेचा वाली* चा आज ५०० वा अंक मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते आज रविवार दिनांक २८ मार्च २०२१ रोजी दुपारी ठीक ४ वाजता प्रकाशन होईल. आजच्या अंकात नियमित सदरांसोबतच *चांदयापासून ते बांदयापर्यंतच्या* प्रेरणादायी शैक्षणिक बातम्या आणि खास आकर्षण म्हणजे खाली नमूद केलेल्या मान्यवरांनी उत्स्फूर्तपणे दिलेल्या शुभेच्छा आणि प्रतिक्रिया ................

१. श्री. धर्मराज सुरेश करपे, प्राथमिक पदवीधर शिक्षक, जि.प.मा.शाळा, धोंडराई, ता.गेवराई, जि. बीड. २. ज्ञानेश्वर मांडेकर केंद्रप्रमुख केंद्र शाळा आगर, जिल्हा अकोला. जिल्हा सल्लागार, साने गुरुजी शिक्षक सेवा संघ ३. श्री. प्रमोद झिरपे विषय सहायक (गणित), जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, औरंगाबाद ४. श्री. संभाजी अच्युत काकडे ९९२२७१६९४१ (प्राथ.शिक्षक) जि. प. शाळा आळवेवाडी, केंद्र-वेळुक, ता. मुरबाड, जि.ठाणे ५. संतोष देशपांडे, जि.प.प्राथ.शाळा डोंगरगाव, ता.बदनापूर, जि.जालना राज्यप्रसिद्धी प्रमुख जुनी पेन्शन हक्क संघटन ६. अशोक गणेश राठोड, संस्थापक अध्यक्ष, ग्लोबल बंजारा अस्तित्व फाऊंडेशन मो 9730334417 ७. अक्रम. आ. शाह ( प्राथ.शिक्षक ) बृहनमुबंई महानगरपालिका शिक्षण विभाग मुंबई. ८. श्री महेश मुळे, नाशिक विभाग संयोजक, भाजपा शिक्षक आघाडी ९. पाटील वर्षा वसंतराव, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, मु.पो. अणदूर ता.तुळजापूर, जि.उस्मानाबाद १०. श्री. बालाजी तोरणेकर, संस्थापक सचिव ग्लोबल अविष्कार फाऊंडेशन नांदेड ११. अशोक धोंडीराम पाटील,विद्यामंदिर मांडवकरवाडी (परळी) ता.शाहुवाडी, जि.कोल्हापूर तथा कार्याध्यक्ष शाहुवाडी तालुका शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर व संचालक शाहुवाडी तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्था मर्यादित बांबवडे १२. श्री. एन. पी. मोरे (सेवा निवृत्त प्राथ.मुखध्यापक) तालुका अध्यक्ष एन. जी. ओ.संघटना,सालेकसा जी. गोंदिया १३. श्री. कमलेश पाटील राष्ट्रीय कार्याध्यक्ष, मराठा सेवा संघ, संस्थापक संयोजक, राष्ट्रीय किसान गण परिषद, नवी दिल्ली १४. सौ. सरिता अजय कलढोणे ( शंकरराव बुट्टे पाटील विद्यालय जुन्नर, जिल्हा –पुणे ) १५. श्री. प्रविणकुमार काळम पाटील जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती गेवराई जि.बीड १६. श्री.विक्रम सोळसे, दिल्ली तसेच हरियाणा राज्य प्रतिनिधी १७. नुतन मघाडे, जिल्हा परिषद जालना १८. नारायण विठ्ठल बाकले, तालूका अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन, मोबाईल क्रमांक -८९७५५३५२६१ १९. समीक्षक डॉ.अनिल सांगळे, वंजारी महासंघ साहित्यिक आघाडी प्रदेशाध्यक्ष २०. श्री साखरे शिवानंद गौरीशंकर, प्राथमिक पदवीधर, जनता बँकेच्या पाठीमागे तुळजापूर जि. उस्मानाबाद २१. श्री.सुभाष काळे ( समाजसेवक, शिक्षक जि.प.प्रा. शाळा खंडोबा वस्ती, केंद्र उमापूर ता.गेवराई जि.बीड ) २२. श्री.विजय बप्पासाहेब काचुळे – पाटील, शासकीय मत्स्यव्यवसाय शाळा बागमांडला ता.श्रीवर्धन जि.रायगड २३. श्री विजयकुमार देसले सर (साहित्यिक व महाराष्ट्र राज्य शासन पुरस्कारप्राप्त शिक्षक) जिल्हा परिषद केंद्रशाळा पडवळपाडा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे. २४. श्री रवि गोसावी ( अध्यक्ष नवनिर्माण सर्व समाज हितार्थ संस्था नंदूरबार) २५. सौ सुरेखा ताई रमेश काळे,कोरेगाव,ता, बार्शी,जि, सोलापूर,महाराष्ट्र २६. श्री मनोज मुकूंद राऊत (मुख्याध्यापक) जि प माध्यमिक शाळा भारोळ, केंद्र - खानिवडे, ता.वसई,जि.पालघर. २७. अशोक विश्वनाथ शेटे ( उपाध्यापक ) जि. प .प्रा. शाळा खांडगाव ,ता. संगमनेर जि. अहमदनगर २८. श्री जे. डी. पाटील (उपशिक्षक ) केंद्रशाळा बांदा नं. १