User:Mpwasnik
हॅलो दलित साहित्य का निर्माण झाले, कोणत्या परिस्थितीमध्ये दलित या वेगळ्या बांधण्याची गरज भासली.ही वांग्मय निर्मिती होणे स्वाभाविक होते की अनिवार्य झाले ही चर्चा होणे गरजेचे आहे कारण "दलित साहित्य हे जीवनाचे नुसते प्रतिबिंब नाही तर जीवन वास्तवाचे दर्शन आहे ते जीवन मूल्य चा हे एक जीवन दृष्टी आहे,"हे डॉक्टर योगेंद्र मेश्राम यांचे म्हणणे अगदी खरे आहे.दलित साहित्य हा दलितांचा भाषिक व्यवहार आहे कारण दलितांनी आपल्या सुख दुखाना आशा आकांक्षांना जाणीव संवेदनांना व्यथा वेदनांना तसेच व्यावसायिक अनुभवांना ही भाषेच्या माध्यमातून उद्गार दिला त्या घरातून दलित साहित्याचा जन्म झाला मनुष्य आपल्या जाणीवा संवेदना भावना विचार इत्यादी सह स्वतःला भाषेच्या माध्यमातून व्यक्त करीत असतो तो मूलतः साहित्य असतो. मराठी साहित्यात दलित साहित्याने मोलाची भर घातली आहे दलित ग्रामीण जीवनातील आपले वास्तविक अनुभव आपल्या जाणिवा त्यांनी व्यक्त केल्या समाजातील तळागाळातील खितपत पडलेल्या दबलेल्या मुक्या भावनांना हुंकार फोडण्याचे काम दलित साहित्याने केले व्हाट्यावर असलेले त्यांचे प्रश्न दुःख वेदना त्यांनी ह्या दलित साहित्य द्वारे पुढे आणले. दलित साहित्य ही काळाची हात होते हे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण एकूणच मराठी वांगमय समाज मुकाने परंपरावादी राहिलेले आहे आपल्या हिंदू संस्कृतीने जे जे मिळेल ते ते गिळंकृत करण्याचे काम केले आत्मसात केले नाही ईश्वरी इच्छा समजून धर्म व्यवस्थेला वर्णव्यवस्थेला जातिव्यवस्थेला गोंजारी राहिले परंतु दलित साहित्याने हे सर्व झिडकारून प्रस्थापित मराठी साहित्याची दिशा व दशा बदलून टाकल्या याचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जाते दलित साहित्याचा पाया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा क्रांतीत उंच जन्माला आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर हे दलित साहित्याचे प्रेरणास्थान आहेत.