User:Kskunalsawant
Tell us more about yourself This page is your user page. You are free to change it however and whenever you want. Just remember, it is your face towards the rest of the community and the world. You can always get back here by clicking on your user name at the very top of every page. |
Start editing Every one of Wikipedia's articles has been created by its readers. Click here to learn more about how quickly and easily you can help make Wikipedia better. As we say: Be bold! |
Personalize Wikipedia With your account, you can enhance your reading and editing experience by marking articles to watch as they evolve and adjusting your settings. |
About me
Click here to add an image of yourself (optional). Important information for minors |
मराठे (अन्य नावे: मराठी माणसे, महाराष्ट्रीय ;) हा गट मूळचा भारतीय उपखंडातील असून, दक्षिण भारतातील दख्खन/डेक्कन प्रांत किंवा सध्याचे महाराष्ट्र राज्य ह्या ठिकाणी ह्या लोकांचे मूळ निवासस्थान आहे.मराठी ही त्यांची मातृभाषा असून ती इंडो-आर्य दक्षिण विभाग समूहातील एक प्रमुख भाषा आहे. मराठी माणसांचा लष्करी इतिहास हा असामान्य आहे. इंग्रजांच्या भारतातील प्रवेशापूर्वी मराठा साम्राज्य हे भारतीय उपखंडात पसरले होते. मराठे हे मुख्यत्वे आर्य लोकांचे वंशज असून, काही जण हे हूण, ग्रीक, पर्शियन वंशातील आहेत. मराठ्यांचा इतिहास [संपादन] सन १६०० पूर्वीचा ( शिवाजी महाराजांच्या उदयापूर्वीचा) उपलब्ध असलेल्या सर्वांत पुरातन माहितीनुसार हल्ली महाराष्ट्र या नावाने ओळखला जाणारा प्रदेश पूर्वी "दंडकारण्य" म्हणून ओळखला जात होता. दंडकारण्य या शब्दाचा अर्थ "कायद्याचे राज्य असलेले अरण्य" असा आहे.
इसवी सन पूर्व ६०० मध्ये महाराष्ट्र हा प्रदेश हे एक महाजनपद होते. मात्र आर्यांच्या प्रवेशापूर्वी या प्रदेशाचे नागरिकीकरण झाले होते की नाही ही माहिती अज्ञात आहे. अशोक राजानंतर हा प्रदेश मौर्य साम्राज्याचा भाग झाला व त्याचे आर्यीकरण झाले. ईसवी सन पूर्व २३० मध्ये स्थानिक राजघराणे सातवाहन हे महाराष्ट्रात सत्तेवर आले. पुण्याजवळील जुन्नर येथील या घराण्याने पुढे उत्तर कर्नाटक व आंध्र प्रदेशातील विजयानंतर एक मोठे साम्राज्य स्थापन केले. आजचे बहुतेक मराठी लोक हे या साम्राज्याचे वंशज आहे असे मानण्यात येते. हे साम्राज्य गौतमपुत्र सत्कर्णी उर्फ शालिवाहन याच्या काळात उत्कर्षाला पोचले. शालिवाहन राजाने नवीन दिनदर्शिका व कालगणना सुरु केली. शालिवाहन शक नावाची ही कालगणना मराठी माणसांकडून आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. या साम्राज्याचा अस्त इसवी सन ३०० च्या आसपास झाला. मराठीच्या पूर्वीची भाषा असलेल्या महाराष्ट्री भाषेचा वापर सातवाहन काळात सुरू झाला.
सातवाहन काळानंतर या प्रदेशावर अनेक लहान लहान राजघराण्यांनी राज्य केले. हा प्रदेश पुढे आठव्या शतकात राष्ट्रकूट घराण्याने जिंकून आपल्या राज्याला जोडला. राष्ट्रकूट घराण्याच्या पाडावानंतर येथे देवगिरीच्या यादवांचे राज्य आले. त्यांनी मराठी ही अधिकृत भाषा बनवली. त्यांचे राज्य १३व्या शतकापर्यंत चालले. पुढे हा प्रदेश मुस्लिम साम्राज्यांतर्गत आला. दख्खनच्या सुलतानीच्या अमलाखाली महाराष्ट्र सुमारे तीन शतके होता.
[संपादन] मराठा साम्राज्य
मराठा साम्राज्याचा विस्तार इ.स.१७६०, ज्या काळात मराठा साम्राज्य आपल्या शिखरावर होते.(पिवळ्या रंगाने दर्शविले आहे)१७व्या शतकाच्या मध्यात शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची स्थापना केली. अनेक विजय व असामान्य कामगिरीनंतर शिवाजी महाराजांचे १६८० मध्ये निधन झाले. शिवाजी महाराजांकडून अनेक वेळा पराभव झालेल्या मोगलांनी १६८१ मध्ये महाराष्ट्रावर आक्रमण केले. शिवाजी महाराजांचा मुलगा संभाजी हा एका छोट्या लढाईनंतर महाराष्ट्राचा राजा झाला. तुलनेने अधिक बलवान शत्रूशी लढा देताना संभाजीने मराठ्यांचे उत्कृष्ट नेतृत्व केले. संभाजी एकही किल्ला किंवा प्रदेश हरला नाही. मात्र १६८९ मध्ये फितुरीमुळे औरंगजेबाच्या हाती सापडल्यानंतर संभाजीची क्रूरपणाने हत्या करण्यात आली. आपल्या नेत्याच्या मृत्यूमुळे निर्नायकी व निराश झालेल्या मराठ्यांचे नेतृत्व संभाजीचा धाकटा भाऊ राजाराम याने केले. त्याच्या मृत्यूनंतर साम्राज्याची सूत्रे पेशव्यांच्या हातात आली. पहिला बाजीराव आणि बाळाजी बाजीराव यांनी मोठा साम्राज्यविस्तार केला. त्यांच्या काळखंडात संपूर्ण उपखंडावर मराठ्यांची सत्ता होती. पुणे हे सत्तेचे केंद्र झाले होते. मात्र पानिपतच्या तिसर्या लढाईनंतर हे साम्राज्य छोट्या छोट्या प्रदेशात विभागले गेले. ब्रिटिशांनी दुसर्या बाजीरावाचा पराभव करेपर्यंत महादजी शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे हे प्रदेश एकत्र होते. पुढे स्वतंत्र भारताच्या निर्मितीपर्यंत मराठ्यांची अनेक छोटी छोटी संस्थाने अस्तित्वात होती.
[संपादन] मराठ्य़ांचा प्रभाव [संपादन] मराठी राज्यकर्ते आणि प्रांत मराठी /मराठे राज्यकर्त्यांच्या सविस्तर यादीसाठी व त्यांच्या प्रांतांच्या माहितीसाठी इथे टिचकी मारा.
मराठा राज्ये आणि राजघराण्यांची यादी
[संपादन] सैन्यात सेवा
मराठा सैनिक , कलाकार: जेम्स फोर्ब्स, इ.स. १८१३[संपादन] इतिहासातील कर्तबगार मराठी व्यक्ती. [संपादन] भोसले व इतर घराणे छत्रपती शिवाजी महाराज भोसले (१६३०-१६८०) - मराठी साम्राज्याचे संस्थापक. छत्रपती संभाजी महाराज भोसले (१६५७-१६८९) - शिवाजी महाराजांचे सुपुत्र. मराठी साम्राज्याचे दुसरे राज्यकर्ते. छत्रपती राजाराम राजे भोसले (१६७०-१७००) छत्रपती शाहू महाराज भोसले (उर्फ शिवाजी २ रे, छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र) छत्रपती रामराजा महाराज भोसले (बहुधा राजाराम महाराजांचे व राणी ताराबाईंचे नातू) मल्हारराव होळकर - मावळ प्रांताचे पहिले सुभेदार. अहिल्याबाई होळकर - इंदूर संस्थानाच्या पालक संस्थानिका. यशवंतराव होळकर - इंदूर संस्थानाचे अधिपती. कान्होजी आंग्रे - मराठ्य़ांचे नौदलप्रमुख. हंबीरराव मोहिते - मराठा सैन्याचे सरनोबत. संताजी घोरपडे - मराठा सैन्यातील सेनाधिकारी. महादजी शिंदे - ग्वाल्हेर संस्थानाचे अधिपती. राणी ताराबाई - कोल्हापूर गादीच्या पालक राणी. झाशीची राणी लक्ष्मीबाई(उर्फ मणिकर्णिका तांबे) [संपादन] पेशवे घराणे बाळाजी विश्वनाथ बाजीराव बाळाजी (थोरले बाजीराव पेशवे) नानासाहेब पेशवे माधवराव पेशवे नारायणराव पेशवे (माधवरावांचा लहान भाऊ) रघुनाथ राव पेशवे ( स्वतःस पेशवे घोषित केले) सवाई माधवराव पेशवे दुसरे बाजीराव पेशवे दुसरे नानासाहेब पेशवे [संपादन] हेही पहा पुणे पेशवे मराठी भाषा महाराष्ट्र मराठा साम्राज्य तंजावुर महाराष्ट्रीय तंजावुरचे मराठा राज्य सरस्वती महाल ग्रंथालय मराठा लाइट इन्फन्ट्री रेजिमेंट (मराठ्यांची भारतीय सैन्यदलातील तुकडी ) महाराष्ट्रातील किल्ले(मराठ्यांच्या ऐतिहासिक अस्तित्त्वाच्या खुणा असणारे किल्ले.)