User:KRISHNA44
कृष्णप्रिय गोशाळा, साई मंदिराच्यामागे किनवट धर्म, संस्कृती रक्षणाबरोबरच गोवंश संवर्धन, संरक्षण आणि संगोपण या हेतूंना पूर्णत्वाकडे नेण्यासाठी या गोशाळेची उभारणी करण्यात आली. आपल्या हिंदू संस्कृतीत व हिंदू धर्मात गायीला अनन्य महत्व आहे. गायीला माता या संज्ञेने औळखल्या जाते. गो वंश टिकला तरच आपली संस्कृती टिकेल. या उद्देशाला मनी बाळगुन या गोशाळे व्दारा अनेक अशे नाविण्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. मुळात गोरक्षा हाच हेतू या गोशाळेचा आहे. दिवसें दिवस समाजात गायीकडे पाहण्याचे व्यापारी दृष्टीकोन होत चालला आहे. त्याच्या विचार करुण या गोशाळेव्दारा गायी विषयीचा सकारात्मक विषय समाजाचा मनात बिंबवणे हाच होय. मन, मेंदू, मनगट परीपक्व राहण्यासाठी जसे संस्काराचे गरज असते. तसेच या मानवी शरीराला निरोगी व सुदृढ ठेवण्यासाठी गायीची आवश्यकता असते. मुळात आपली भारतीय शेती हे या गोवंशावरच आधारलेली आहे. जर गोवंशच टिकला नाही तर पुढे आपल्या परंपरागत शेतीचे काय होणार हा एक महत्वाचा प्रश्न आहे. देव दानवांच्या समुद्र मंथनातून निघालेले अनमोल रत्न म्हणजे गाय. गाय एक कामधेनु तो सर्वांसाठी कल्पवृक्षच आहे. हा विचार सर्व समाजा पर्यंत पोहोचविण्यासाठी कृष्णप्रिय गोशाळा व्दारा, करु सेवा गायीची ..... मिळवू शक्ति जिवनाची या उद्देशाला पूर्णत्वाकडे पोहोचविण्यासाठी गोशाळेचे प्रयत्न चालु आहे. कोटयावधी भारतीयांची श्रेध्देय असलेली ही गोमाता ती सर्वांसाठी जीवन संजीवनच आहे. ते राष्ट्राची शक्ति देवता आहे. अशा या अनमोल रत्नांचे दिवसें दिवस होणारी कत्तल मन विशन्न करणारी आहे. दिवसें दिवस वाढणारे कत्तलखाने हा चिंतेचा व चिंतनाचा विषय होवून बसला आहे. गोवंश संपविण्याचा अनेकांनी जणू विळाच उचल्ला आहे. गोवंश हत्या बंदी कायदा व शासनाची धरसोड भुमिका विचार करायला लावणारी आहे. या अशा गहण प्रश्नातून उत्तर शोधत किनवट व किनवट परीसरातील गोरक्षक, गोभक्त यांना या गोशालेत आपल्या गोमातेचे संगोपण आणि संगोपण कशे होते हे पाहण्यात निश्चीत आनंद वाटेल.
आरोग्य दायीनी गाय.. व सुख संवर्धक गाय या उक्तीला प्रत्येक्षात उतरविण्यासाठी या गोशाळेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. काही सुजाण गोभक्तांनी एकत्र येऊन कृष्णप्रिय गोशाळेच्या उभारणीला हातभार लावला. गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २०११ रोजी या गोशाळेची उभारणी करण्यात आली. एक बहुउद्देशीय प्रतिष्ठाण स्थापन करुन या गोशाळेव्दारा अनेक समाज उपयोगी, लोकोपयोगी उपक्रम राबविल्या जावू लागले. त्यात क्रमश:
१. कैलास मोक्षभुमी किनवट येथील स्मशानभुमीचे पुर्न निर्माण.
पैनगंगेच्या काठी असलेल्या किनवट येथील जुन्या अशा स्मशान भुमीची आवस्था सर्वांसाठी विचार करायला लावणारी होती. ज्या ठिकाणी आपला शेवटचा अंतीम संस्कार केला जातो. ती भुमी चांगली, सुसज्ज व सर्व सोयींनी युक्त का असू नये. हा विचार मनात घेऊन कृष्णप्रिय गोशाळेव्दारा स्मशानभुमीच्या पुर्न निर्माणाचे काम हाती घेण्यात आले. कैलास मोक्षभुमी असे नाम करुण इथे लोकांना थांबण्यासाठी निवारा शेड, पाण्याची व्यवस्था, विद्युत व्यवस्था, बाग-बगीचा तसेच अंतिम संस्कारासाठी लागणाऱ्या अनेक वस्तूंची उपलब्धता करुण देण्यासाठी गोशाळेने पुढाकार घेतला. याच व्यवस्थेचा दुसरा भाग म्हणजे कैलासमोक्ष रथ होय. किनवट शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता अनेकांना हि स्मशानभुमी दूर वाटू लागली. त्यामूळे तीन ते चार कि.मी. वरुन या स्मशानभूमी पोहोचण्यासाठी बराच वेळ लागु लागला. याचा विचार करुन गोशाळेव्दारा कैलासमोक्ष रथ उपलब्ध करुन देण्यात आला. आज त्याच्या उपयोग अनेकांना होतो आहे. याच गोशाळेव्दारा शवपेटी उपलब्ध केली असून याचा उपयोग निश्चीतच अनेकांना होतो आहे.
२. थंड व शुध्द
निरोगी जिवन हेच सुखी जीवन हा हेतू डोळयासमोर ठेवत गोशाळेव्दारा शहरातील चौका चौकात, मंदिरांच्या आवारात थंड व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या पूर्वी अनेकांना या-ना त्या कामांसाठी शहरात यावे लागायचे मात्र उन्हाळयात तहान लागल्यावर हॉटेल शिवाय पर्याय नव्हता. ही अडचण लक्षात घेऊन गोशाळेव्दारा थंड व शुध्द पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. असंख्य गरजू या बाबींचा लाभ घेऊन आनंदी व समाधानी होतांना दिसतात.
३. फिरत्या टँकरव्दारा पाणी व्यवस्थापन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
अनेक सामाजीक, धार्मीक, आनंदाच्या व दु:खाच्या प्रसंगी गोशाळेकडे मागणी केल्यास गोशाळा पाण्याचे टँकर पूरविण्याचे काम करते. यामूळे विनामुल्य संबंधीतांना त्याचा लाभ घेता येतो.
४. माहूर क्षेत्रीचा नवरात्र महोत्सव व निशुल्क अन्नछत्र
महाराष्ट्रातील साडेतीन पिठापैकी माहूरचे माता रेणूकेचे मूळ पिठ होय. हजारो भावीक आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी माहूरला येतात. माहूरच्या देवीचे थोर भक्त संत विष्णूदास एका काव्यात म्हणतात, नको साधन धन काही ...... काम स्तवनाचे नाही.... आई रेणूके तूला साधे बोलणे पूरे ...... या हेतूला म्हणी बाळगुण कृष्णप्रिय गोशाळेव्दारा सन २०१०-११ वर्षापासून माहूर गडाच्या पायथ्याशी असलेल्या विस्तीर्ण अशा जागेवर नवरात्र महोत्सवातील पहिल्या माळेपासून ते नवव्यामाळेपर्यंत मोफत अन्नछत्र चालवीले जाते. त्यात भक्तांसाठी सकाळचा चहा सोबत बिस्कीट, नास्टा, उपवासाचा फराळ आणि ज्यांना उपवास नाही अशांना भोजन दिले जाते. सकाळी ७:०० ते रात्री ११:०० पर्यंत हा अन्नछत्राचा सोहळा पार पडत असतो. या अन्नछत्राचा असंख्य भावीक आनंदाने लाभ घेतात.
५. दत्त जयंती निमित्य माहूर दत्त शिखरावर अन्नदान कार्यक्रम
सबंध महाराष्ट्रातील प्रसिध्द असे दत्त क्षेत्र म्हणजे माहूर होय. दत्त शिखरावर प्रत्यक्ष दत्तात्रे प्रभु भक्तांच्या कामना पूर्ण करतांना दिसतात. दत्त जन्माचे ठिकाण हेच होय. या ठिकाणी दत्त जयंती निमित्य मोठी यात्रा दरवर्षी भरत असते. हजारो भावीक दत्ताचे दर्शन घेण्यासाठी गडावर येतात. अशा भक्तांना निशुल्क भोजन देता यावे हि संकल्पना मनी बाळगुन गोशाळेच्या वतीने अन्नदान कार्यक्रम केला जातो. २०१२ पासून सुरु झालेला हा सोहळा सर्वांना आनंद देतो आहे. माहूर दत्त शिखरचे महंत प.पूज्य मधूसुदन भारती महाराज यांच्या मार्गदर्शनातून हा दत्त जयंती सोहळा पार पाडतो.
६. प्रबोधनवर व्याख्यानाचे आयोजन
आपण समाजाचे काही देणे आहोत ही जाणीव मनी बाळगुण गोशाळेव्दारा गाय हा मुख्य विषय घेऊन अनेक मान्य वरांच्या व्याख्यांनाचे आयोजन केल्या जाते. महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील ख्यात किर्त वक्त्यांची व्याख्याने आयोजित केल्या जातात. प्रत्येक महिन्याच्या पोर्णिमेला सायं. ७:०० वा. गोशाळेच्या प्रागणात व्याख्यानाचा आनंद घेण्यासाठी असंख्य गोभक्त हाजेरी लावतात.
७. श्री सत्य नारायण पूजा व महाप्रसाद
प्रत्येक महिण्याच्या पोर्णिमेला कृष्णप्रिय गोशाळेमध्ये सत्य नारायणाची पूजा केल्या जाते. त्या निमित्य महा प्रसादाचे आयोजन करण्यात येते. हा महाप्रसाद घेण्यासाठी अनेक गोभक्त गोशाळेत येतात.
८. रुग्ण सेवेसाठी सुसज्ज दवाख्यान्याची निर्मिती
बुडते हे जण न देखवे डोळा ......... म्हणून कळवळा वाटत असे. या संत तूकारामांच्या अभंगानुसार समाजातील दु:ख, दारिद्रय, कुपोषण पाहुण निश्चितच मन हेलावल्या शिवाय राहत नाही. अशा गरजू निराधार रुग्णांना पूर्ण रुपात आरोग्याची सोय व्हावी हा हेतू मनी बाळगुन कृष्णप्रिय गोशाळा एक सुसज्ज अशा दवाखान्याची उभारणी करते आहे. काम प्रगती पथावर आहे.
९. कृष्णप्रिय गोशाळा व मोफत गोमूत्र
कृष्णप्रिय गोशाळेव्दारा अनेकांना मोफत गोमूत्र पुरविण्याचे काम केल्या जाते. पहाटे ५ ते ७ या वेळात शुध्द व ताजे गोमूत्र गोभक्तांसाठी उपलब्ध केल्या जाते. अनेक गोभक्त आपल्या व्याधी दुर करण्यासाठी या गोमूत्राचा लाभ घेतांना दिसतात. विशेष: हा गोशाळेत काळया कपीला गायीचे गोमूत्र आरोग्य संवर्धक आहे.
एक कुटूंब एक गाय ....
कृष्णप्रिय गोशाळेव्दारा केवळ गोशाळेतच गो संवर्धन केल्या जाते असे नाही तर प्रत्येकाने आपल्या घरी एक तरी गाय साभांळावी व गायीचे संगोपण, संवर्धण करावे यासाठी प्रत्येकाला हा विचार पटवून देण्याचे काम गोशाळेव्दारा केल्या जाते. आज याचा परिणाम शहरात अनेकांनी आपल्या कुटूंबात गायीला सदस्यत्व केले आहे. गायीची सेवा ही ईश्वर सेवा मानत अनेक गोभक्त जीवनाचा आनंद घेत आहे.
१०. हिरवे शहर ...... सुंदर शहर......
निरोगी व सुखी जीवनासाठी जशी अन्नाची गरज तशीच गार सावली देणाऱ्या वृक्षांचीही गरज आहे. दिवसें दिवस वृक्षांची तोड विचार करायला लावणारी आहे. हा विचार मनात घेऊन गोशाळेव्दारा हिरवे शहर सुंदर शहर हा प्रकल्प राबविण्याचा मानस आहे. प्रत्येकानं एक झाड तरी लावून वाढवावे. त्यासाठी गोशाळेचा प्रयत्न राहणार आहे.
कृष्णप्रिय गोशाळेचे पुढील ध्येय :-
गायीचा वंश वाढविणे, संवर्धण आणि संगोपण करणे, गायींची कत्तल थांबवीणे, गोहत्या बंदी कायद्याची कडक अमल बजावणी करायला लावणे. जनमानसात गायीचा लाभाचे महत्व पटवून देणे. गाय कशी लाभदायक आहे हे समाजा समोर मांडणे. निकोप, निरोगी, सुदृढ, बलशाली, शक्तिवर्धक समाज निमार्ण होण्यासाठी अनेक मार्गाने प्रयत्न करणे.
सर्वत्र सुखीन संतू : सर्वे संतू निरामया : या उद्देशाकडे जाण्याचा प्रयत्न करणे.