Jump to content

User:Ghodeshwaridevi

From Wikipedia, the free encyclopedia

घोडेश्वरी देवीचा इतिहास (श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान) घोडेगाव अहमदनगर जिल्ह्यातील नगर-औरंगाबाद रोड वर एक छोटेसे गाव. साधारणतः १००० वर्षांपूर्वी याचे नाव निपाणी वडगाव होते. उन्हाळ्याच्या दिवसात या गावातील लोकांना पाणी टंचाईमुळे पिण्यासाठी पाणी मिळत नसे. त्या काळात गावात पाण्याची खूप बिकट परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याच्या शोधासाठी गावातील लोकांना लांब लांब भटकावे लागत असे. साठ सत्तर घरे असलेल्या या गावात पाणी नसल्याने या गावाला निपाणी वडगाव असे नाव पडले.

  गावातील पाण्याचा प्रश्न मिटवण्यासाठी गावातील सर्व लोक एकत्र आले व सर्वांनी मिळून श्रमदानातून गावात एक विहीर खणण्याचे ठरवले. खूप कष्टाने १० परस विहीर गावकर्यांनी खांदली. परंतू विहिरीला एक थेब देखील पाणी लागले नाही. गावकरी निराश झाले त्यामुळे गावकऱ्यांना विहिरीचा नाद सोडून दिला.

काही दिवसानंतर गावाच्या पूर्वेला असलेल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील एका साधूने गावाकर्याना त्या मंदीराजवळ विहीर खोदण्याचे सुचवले आणि तेथे नक्की पाणी लागेल असे सांगीतले. गावाच्या पूर्व दिशेला तुळजाभवानी मातेच्या मंदिरा जवळ विहीर खोदण्याचे काम सुरु झाले. साधारण सहा परस [३६ फुट] खोदकाम झाले तरी पाण्याचा थेब लागेना त्यामुळे या ही विहिरीचे काम व्यर्थ जाते कि काय आसे गावाकार्याना वाटू लागले. काम चालू असतांना एका मंगळवारी सहा परसाच्या पुढे आचानक एक अश्वरूपी [घोड्याच्या आकाराची] दगडाची मूर्ती सापडली. ही मुर्ती कशाची व ती येथे कशी आली हा प्रश्न गावकऱ्यांना पडला. त्या रात्री गावच्या पाटलाच्या स्वप्नात एक देवी आली व म्हणाली ‘“मी घोडेश्वरी देवी आहे माझी प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानीच्या मंदिरात करा. यापुढे या गावातील लोकांना पाणी कमी पडणार नाही व गावची कीर्ती सर्वदूर पसरेल ‘ असा दृष्टांत देवून देवी अंतर्धान पावली. दुसऱ्या दिवशी पाटलांनी गावातील लोकांना रात्रीचा दृष्टांत सांगितला व त्या प्रमाणे घोडेश्वरी देवीची प्राणप्रतिष्ठा तुळजाभवानी मंदिरात रेणुका मातेच्या शेजारी केली. त्यानंतर त्या विहिरीचे काम केल्यानंतर विहिरीस भरपूर पाणी लागले. पाणी पिण्यास गोड होते तसेच या विहिरीच्या पाण्याने अनेक त्वचारोग बरे होतात असा अनुभव गावकऱ्यांना येऊ लागला. अश्वरूपी घोडेश्वरी देवीची मूर्ती सापडल्यानंतर देवीच्या कृपेने गावातील पाण्याचा प्रश्न कायमचा मिटल्यामुळे या निपाणी वडगावचे नाव घोडेगाव असे पडले. घोडेश्वरी देवीची मुर्ती स्वयंभु आसून कुणीही न घडवता आपोआपच तयार झाली आहे. देवीचे मंदिर हेमाडपंथी म्हणजे मोठमोठ्या दगडांनी बनवलेले आहे. अशा या स्वयंभू घोडेश्वरी देवीचे साक्षात्कार आजच्या या कलीयुगात देखील अनुभवयास मीळतात.

घोडेश्वरी देवीची यात्रा घोडेश्वरी देवीची यात्रा वर्षातून दोन वेळा भरते. एक चेत्र कृष्ण पंचमी म्हणजे एप्रिल महिन्यात मोठी यात्रा भरते. यात्रेचे पहिले दोन दिवस कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यात्रेच्या पूर्व संध्येला रात्री बारा वाजता गोदावरी [ गंगा ] नदीचे पवित्र पाणी कावडीने आणण्यासाठी अनेक भक्तजन जातात व हे पवित्र पाणी कावडीने रात्र भर पायी अनवाणी चालून आणले जाते व यात्रेच्या दिवशी पहाटे घोडेश्वरी देवीला गंगा-गोदावरीच्या स्नानाने यात्रेची सुरवात होते. सकाळी भव्य मिरवणूकिने वाजत-गाजत देवीस नैवद्य व चोळी पातळ अर्पित केले जाते. त्या दिवशी संध्याकाळी भव्य पालखी मिरवणूक [छबिना] होवून शोभेची दारू उडवली जाते. दुसऱ्या दिवशी यात्रेसाठी आलेल्या कलाकारांचा सम्मान करण्यासाठी हजेरीचा कार्यक्रम व उत्सवासाठी मदत करणाऱ्या लोकांचा सत्कार केला जातो व दुपारी कुस्त्यांचा हंगामा भरविला जातो.विजेत्या पहिलवानाला रोख बक्षिसे दिली जातात. घोडेश्वरी देवीचा यात्रा उत्सव सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन करतात. याच यात्रेचा एक भाग म्हणून यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने सैय्यद बाबांचा संदल उत्सव साजरा केला जातो. त्यानंतर प्रत्येक वर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला ऑक्टोंबर महिन्यात शारदीय नवरात्र घटस्थापना केली जाते. त्यामध्ये पहिली माळ, चौथी माळ व आठव्या माळेत प्रवचन, भजन-कीर्तनाचे धार्मिक कार्यक्रम होतात व इतर माळेला भक्तांच्या नवसाचे गोंधळ होतात. त्या नंतर कोजागिरी पौर्णिमेला मंदिरासमोरील दिपमाळेवर दीप प्रज्वलित केला जातो. नवरात्रात मंदिरात देविपुरण, देविमाहात्म्य, देवीभागवत पुराण, दुर्गा सप्तशतीचे पारायण केले जाते. या उत्सव काळात देवीच्या उत्सव कार्यात व इतर सामाजिक कार्यात कोणी अडथळा आणल्यास त्यास काही दिवसातच देवीच्या चमत्कारास सामोरे जावे लागते. तसेच गावात गुंडगिरी-दादागिरी करणाऱ्यांचा, कोणत्याही समाजातील सरळ व्यक्तीचा छळ करणाऱ्याचा नायनाट [ नि:पात ] एक वर्षाच्या आत होतो हा आजपर्यंतचा गावातील लोकांचा अनुभव आहे. आशा या स्वयंभू घोडेश्वरी देवीचे अनेक साक्षात्कार आज देखील पाहायला मिळतात.

          • जय घोडेश्वरी देवी *****

श्री घोडेश्वरी सामाजिक प्रतिष्ठान मु.पो. घोडेगाव, ता. नेवासा, जि. अहमदनगर (महाराष्ट्र). पिन – 414607. मोबाईल – 898 33 444 55 / 97671 86444 / ईमेल – GhodeshwariDevi@gmail.com