Jump to content

User:Geetamit

From Wikipedia, the free encyclopedia
              बोधकथा
               प्रवाह

एका आश्रमात गुरु आणि त्यांचे शिष्य राहत असत. ते दररोज नदीला जात.स्नान करण्यासाठी जात.एके दिवशी स्नानाला गेल्यानंतर गुरु नदीतून न उतरता नदीच्या काठावरती ध्यान करत बसले त्यांना ध्यान करतात ना पाहून सर्व शिष्य शांत बसले.सकाळची दुपार दुपारची संध्याकाळ झाली पण कुणीही गुरूंना विचारले नाही की आपण स्नान कधी करायचे तेव्हा एक शिष्याने धीर करून गुरूंना विचारले की गुरुवर्य स्नान कधी करायचं संध्याकाळ झाली. आपण आश्रमात कधी जाणार तेव्हा गुरु म्हणाले की या नदीचा प्रवाह थांबल्यानंतर आपण आंघोळ करूया त्याच्यावरत तो शिष्य म्हणाला की हे कसं शक्य आहे ही नदी आहे ही निरंतर चालणारी आहे त्याचा प्रवाह थांबणार नाही मग आपण कधीच आंघोळ करायची नाही? का त्यावरती गुरु म्हणाले की हीच आजची शिकवण आहे. आपल्या आयुष्य ही असेच आहे. ते कधीच कोणासाठी थांबत नाही ते निरंतर चालत राहते कुठल्याही संकटाला अडचणींना घाबरून आपण थांबायचं नाही.