Jump to content

User:A Bharatdas

From Wikipedia, the free encyclopedia

Govindrao Narkhedkar

स्वातंत्र्यसैनिक गोविंदराव मेंगाजी नरखेडकर यांची माहिती

जन्म:- १९/१२/१९०८ जनुना, ता. जि अमरावती (महाराष्ट्र) मृत्यू:- २९/११/१९८७ वऱ्हा, ता. जि अमरावती

शिक्षण:- ७ वी पास सुरुवातीची नोकरी:- पटवारी (तलाठी) नंतर शिक्षक, मुख्याध्यापक (निवृत्त)

विवाह:- १९२८ (तुळसाबाई) अपत्ये:- १२ (९ मुली+३ मुले)

सुरुवातीपासूनच समाजकारणाची आवड, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या स्थापनेपासूनच स्वयंसेवक.

१९२१ साली वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी असहयोग आंदोलनात सहभाग घेतला, मात्र १९२२ साली चौरीचौरा कांडानंतर गांधीजींनी आंदोलन स्थगित केल्यामुळे त्यांनी क्रांतीच्या मार्गाने जाण्याचा निश्चय केला.. 

अमरावती येथील हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे त्यांची भेट क्रांतिकारक शिवराम हरी राजगुरू यांच्याशी झाली.. त्यांच्या भेटीनंतर त्यांचा भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांती विचारांशी संपर्क आला, आणि देशाला याच मार्गाने स्वातंत्र्य मिळू शकते यावर त्यांचा ठाम विश्वास बसला..

दरम्यान मार्च १९३१ साली राजगुरू, भगतसिंग,आणि सुखदेव यांना फाशी झाल्यानंतर त्यांनी काही काळ गुप्त पणे कारवाया सुरू ठेवल्या..

यादरम्यान त्यांच्या कारवायांमुळे त्यांना ब्रिटिश सरकार ने सरकारी नोकरीतून बरखास्त केलं, मग ते पारिवारिक उदरनिर्वाहासाठी शेती करू लागले..

त्यांनी १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला..

सप्टेंबर १९४६ साली रात्रीच्या अंधारात एका इंग्रज शिपायाला ज्वारीच्या पोत्यात बांधून त्यांनी जबर मारहाण केली, त्यात तो गंभीर जखमी झाला, मात्र तीन महिने ते ब्रिटिशांना गुंगारा देत होते, परंतु डिसेंम्बर १९४६ ला ब्रिटिशांना माहिती मिळाली की हे काम गोविंदराव नरखेडकर यांनी केलंय, त्यांना तात्काळ अटक झाली, दोनच महिन्यात या खटल्याचा निकाल आला आणि फेब्रुवारी १९४७ ला त्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली, परंतु ऑगस्ट १९४७ ला देश स्वतंत्र झाल्यावर सहाच महिन्यात त्यांची तुरुंगातून मुक्तता झाली, स्वातंत्र्यानंतर नंतर ते शिक्षक झाले.. १९६६ साली ते मुख्याध्यापक म्हणून निवृत्त झाले.

१९७५ साली देशावर आणीबाणी लादल्यानंतर त्यांनी केलेल्या विरोधामुळे त्यांना पुन्हा अटक झाली..

दिनांक २९ नोव्हेम्बर १९८७ रोजी वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला..