User:सुनिल अनंत धावडे
'२८ नोव्हेंबर १६५६...
गडकोटांची मजबुती मराठ्यांच्या बलिदानाने मजबूत झालेली दख्खन दौलत “किल्ले पन्हाळागड”....🚩 पन्हाळा किल्ला शिलाहार वंशीय राजा भोज व्दितीय याने इ.स ११८७ रोजी बाधला त्यानंतर ह्या किल्ल्यावर यादव-वंशीय सिंघन राजाचे वर्चस्व आले व इ.स १४८९ साली तो आदिलशाही सत्तेखाली आला मराठी राज्याचा इतिहासात ह्या गडाला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले... छत्रपती शिवाजी महाराजांनी २८ नोव्हेंबर १६५६ साली पन्हाळा जिंकून घेतला २ मार्च १६६० रोजी आदिलशाही सरदार सिद्दि जैहर याने ह्या गडाला वेडा दिला हा वेडा जवळपास चार महिन्यापेक्षा अधिक काळ चालू होता.. गडावरील अन्नधान्याचा साठा संपत आल्यामुळे व सिद्दि जौहरच्या तीस हजारांपेक्षा जास्त सैन्याशी लढता येणे अशक्य असल्यामुळे शिवरायांना या गडावरून युक्तीने निसटणे क्रमप्राप्त होते शेवटी शिवरायांनी फक्त सहाशे मवळ्यानिशी ६५ किमी दूर असलेल्या विशाळगड किल्ल्याकडे जाण्याचे ठरविले पावनखिंडीच्या ऐतिहासिक प्रसंगानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड आदिलशाहीच्या ताब्यात दिला त्यानंतर कोंडाजी फर्जद व अनाजीपंत ह्या शिवाजी महाराजांच्या शुर सैनिकांनी फक्त साठ लोकांना घेऊन हा किल्ला पुन्हा १६७३ रोजी जिंकून घेतला १७२८ ते १८२७ पर्यंत ताराराणी साहेबांनी ह्या किल्ल्याचा वापर मराठी राज्याची राजधानी म्हणून केले....