Jump to content

User:सत्य वार्ता

From Wikipedia, the free encyclopedia

ओबीसी समाजाचा अंत पाहू नका - प्रा.टी.पी.मुंडे

ओबीसी समाजाच्या मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर..!

पारंपारिक वाद्यांसह ओबीसी समाजाच्या बांधवांनी दाखवली एकतेची वज्रमूठ महिलांचाही लाक्षणिक सहभाग..!

परळी वैजनाथ प्रतिनिधी

संपूर्ण राज्यात ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण महा विकास आघाडीच्या सरकारच्या वेळकाढूपणा मुळे व नाकर्तेपणामुळे सुप्रीम कोर्टाने रद्द केले त्यामुळे संबंध महाराष्ट्रातील ओबीसी समाज आक्रमक झाला आहे ओबीसी सह अलुतेदार बलुतेदार व इतर ओबीसीत समाविष्ट असणाऱ्या समाजाचा अंत महा विकास आघाडी सरकारने पाहु नये असा इशारा ओबीसी नेते प्रा.टी.पी. मुंडे( सर) यांनी दिला महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चा च्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य निदर्शनात ते बोलत होते . सदरील मागण्यांचे निवेदन ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांच्या व नेत्यांच्या उपस्थितीत तहसीलदारांना सादर

करण्यात आले.

ओबीसी समाजाच्या न्यायिक व संविधानिक मागण्यांच्या निषेधार्थ आज परळी वैजनाथ येथे दि 24 गुरुवार रोजी ओबीसी जनमोर्चा चे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे कोषाध्यक्ष चंद्रकांत बावकर उपाध्यक्ष प्रा. टी. पी. मुंडे (सर) यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात तहसील कार्यालयावर निदर्शने करण्यात आली त्या अनुषंगाने परळी येथे काढण्यात आलेल्या ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी भव्य निदर्शने ओबीसीचे नेते प्रा टी पी मुंडे सर यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाले.

निवेदनात पुढील मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे त्यामध्ये (1) ओबीसी चे स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण पूर्ववत करा.( 2) पदोन्नती मेगाभरती, ओबीसीची अनुशेष भरती करा.(3) जातनिहाय जनगणना करा. (4)ओबीसी आरक्षणामध्ये इतर कोणत्याही समाजाचा समावेश करू नये .(5) नॉन क्रिमिलियर मध्ये वाढ करावी.(6) ऑल इंडिया मेडिकल कोट्यात ओबीसीच्या कमी केलेल्या जागा वाढवून द्याव्यात यासह विविध मागण्यांचा समावेश आहे.

    या भव्य निदर्शनात महिलांच्या लाक्षणिक सहभागासह पारंपारिक वाद्यांच्या गजरात ओबीसी बांधवांनी आपली एकतेची  वज्रमूठ दाखवली त्यामुळे तहसील परिसराचे ओबीसीमय वातावरण पाहायला मिळाले. ओबीसी समाजातील नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. मराठा समाजाच्या आरक्षणाला ओबीसी समाजाचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण सरकारने जरूर द्यावे पण ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता द्यावे त्यासाठी ओबीसी लहान भाऊ म्हणून मराठा समाजाच्या पाठीशी उभा राहील तसेच महा विकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीत ठराव संमत होत असताना ओबीसी मंत्र्यांनी विरोध का केला नाही आणि हे मंत्री मुग गिळून गप्प का बसले आहेत असा सवाल ओबीसी नेते प्रा.टी. पी. मुंडे (सर) यांनी उपस्थित केला.


या भव्य निदर्शनात व्यासपीठावर ओबीसी समाजातील नेते प्रा. नरहरी काकडे, रिपाईचे मा. भास्कर नाना रोडे , मा.विलास ताटे, मा. भीमराव सातपुते ,मा. भीमराव मुंडे ,मा.बाबासाहेब काळे ,मा.माऊली बिडगर,मा. आत्माराम कराड ,मा. सूर्यकांत मुंडे ,डॉ.माणिक कांबळे ,मा. अनिल मस्के ,ॲड संजय जगतकर ,,प्रा विजय मुंडे ,मा. मनसुख भाई, मा.सुदाम लोखंडे ,मा. काशिनाथ राठोड ,मा.विनायक गडदे,मा. संतराम गडदे ,मा.रवींद्र (पापा) गीते ,मा.छत्रपती कावळे ,मा .जयश्री ताई मुंडे- गीते, नूरबानू खाल्ला,मा. विश्वनाथ देवकर,मा. नवनाथ क्षीरसागर ,मा.जम्मू शेठ ,मा.छत्रपती कावळे , मा. श्याम गडेकर,कारभारी फड,मा. सुंदर मुंडे,मा. भागवत सलगर, मा.माणिक सलगर,मा. इंद्रजीत दहिफळे,मा. ताराचंद फड,मधुकर मुंडे, जि प सदस्य प्रदीप भैया मुंडे ,शेख इलियास,बंडू कांदे,प्राचार्य बी. डी. मुंडे,श्रीकिसन सातभाई,मुरलीधर महाराज गडदे,अंतराम नागरगोजे,विष्णू सातभाई,किशोर जाधव,हनुमंत गुट्टे,वसंत मुंडे,माऊली गडदे,अशोक साळवे,तुकाराम कुकडे,पप्पू कांदे,राजाभाऊ तांदळे,सुखदेव चव्हाण, भागवत मुंडे,श्याम राठोड, राहुल कराड, सचिन गित्ते,हनुमंत रुपनर,आदीसह ओबीसी समाजात काम करणारे विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.